अ कविता ऑन कुजके दिवस : A Tribute to Violence
तुकडा एक
कवितेतील कविता:
नासके something
फ़ेसबुक प्रोफ़ाईल
पेज: पिस्तुल
लोकेशन: समशान व्हाया दसरा चौक
This
route has tolls.
Details: These directions are for planning
purposes only. You may find that construction projects, traffic, weather, or other
events may cause conditions to differ from the map results, and you should plan
your route accordingly. You must obey all signs or notices regarding your
route.
तुकडा दोन
कवितेतील कविता: वास कुठून येतोय
वॉट्सऑप प्रोफ़ाईल
पेज: अनवाणी मनुष्य
लोकेशन: हिअर देअर एनीव्हेअर
o minute without traffic.
Details: NA
--
तुकडा तीन
कवितेतील कविता: प्रोसेसेस
टू किल
To kill a process uses the kill
command.
प्रोसेस १.
निवडणे.
Always try to
kill a process with a simple kill command. kill process_identifier
ऑप्शन्स: लहान मुले. बायका. म्हातारा-म्हातारी.
वा
रस्त्यावर लंगडत जाणारे कुत्रे.
मनाविरुध्द
आवाज. दुर्लक्ष न करता येणारे विचार.
वा
पडणारी क्रांतीची स्वप्ने.
प्रोसेस २. मोका
साधणे
This tells the process to hang-up just as though you were logging out.
मार्ग: राज्यव्यवस्था गोणपाटात ठेवणे
सुयोग्य
वेळ निवडणे
विचाराने
न भिडणे
प्रोसेस ३. अब तक छप्पन उडाओ
This
will stop the process dead in its tracks.
परिणाम: समोरून
नेम धरला तर छाताड किंवा थेट मेंदु.
रक्ताच्या
ओघळाची लांबी चेक करणे.
हिस्ट्रि
डिलिट करणे
किंकाळी
म्हणजे हनुमानाच्या शेपटीची आग
गॅलेक्सीजनाही कान असतात.
Warning: The process it may leave any child processes
still running.
--
तुकडा चार
कवितेतील कविता: रक्ताची मळमळ
कोतळा फ़ाडून जेवायला बसलेली
आतडी. हाडे. मांस. पेशी.
चाकूला ओरबाडून पुसाटी बुरजावरुन
ओघळत हिरव्याकंच झुडपात गुडूप.
समशानाच्या शेणकुटाच्या घगीत
अफ़वांची फ़ौज
बुरजाखाली राखूंडी लावत
आताशाच दमून आळसावलेली.
बटरफ़्लाई स्वप्ने कोल्हेकुईंच्या दातात
भीषण उन्हात, हेंडकूळात अडकलेली कुत्री
वास्सेपुरच्या गुंडांची याद देत.
ओकारीसाठी पोटात अन्नही घेववत नाही
ओमेझ, पॅन डी सगळेच निरुपयोगी.
कमोडचे भांडे उलथवून टाकावे
फ़ेकावी मळमळ बाहेर
बारक्या आतड्याची स्प्रिंग ताणावी
मैल भर: एक, दहा शेकडो आणि,
दोरखंडाला धरून पाहावीत ती
लाल स्वप्ने आरंभापासून त्याने दाखवलेली.
वा व्हॅन गॉगची फ़ुले.
कधीकाळच्या हिरव्यागार पुसाटी बुरजाची आठवण.
---
तुकडा पाच
कवितेतील कविता: अ
कन्व्हिक्शन ऑफ़ अ वाईल्ड प्रोसेसर
झेंडूच्या फ़ुलांना लगडतील आंबे
आंब्याला फ़ुटेल मोहर चिंचांचा
चिंचाचे करतील हिरवेगार गोळे
गोळे शिरतील म्हाता-याच्या पोटी
पोट दिसेल पहिल्याच महिन्यात
नाकातून डोळ्यातून कानातून बोटातून
बाहेर येतील वडाच्या पारंब्या
लोंबकाळतील पारंब्या इन्स्टाग्रॅमच्या प्रोफ़ाईलला
प्रोफ़ाईल चमकवतील चिखलातले रिफ़्लेक्शन्स.
(इन्स्टाग्रॅम
प्रोफ़ाईल: चिखलातली चमकती रिफ़्लेक्शन्स)
----
Comments